मुंबई

कल्याण रिंगरूटवर अपघातांची मालिका

CD

अर्धवट रिंग रूटवर अपघातांचा धोका
अनधिकृत ढाबे-टपऱ्या, बेशिस्त पार्किंग आणि भरधाव दुचाकींचा सुळसुळाट
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : कल्याण रिंग रूटवर अपघातांचा धोका वाढत असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही अर्धवट मार्गावरून वाहतूक सुरू आहे. त्यातच अनधिकृत ढाबे-टपऱ्या, रस्त्यालगतचे बेशिस्त पार्किंग आणि भरधाव दुचाकीस्वारांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. अपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुर्गाडी कचरा डेपो ते वाडेघर, उंबर्डे, गांधारी, बारावे, वडवली, अटाळीमार्गे टिटवाळ्यापर्यंत हा रिंगरूट जातो. या मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी भूसंपादनाअभावी उर्वरित काम रखडले आहे. रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे, तर भूसंपादनाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे आहे. उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही महिन्यांत काम मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अनधिकृत ढाबे आणि टपऱ्यांमुळेही रस्त्याचा वापर प्रभावित होत आहे. त्यातच काही दुचाकीस्वार वेगमर्यादेचे उल्लंघन करत असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अतिक्रमणे हटवणे, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करणे, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स आणि सूचना फलक लावणे गरजेचे आहे.

रिंग रूटचे काम पूर्णत्वाकडे असल्याचा दावा होत असताना प्रत्यक्षात अपूर्ण मार्गावरून वाहतूक सुरू आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली आहे आणि उर्वरित काम कधी पूर्ण होणार, याबाबत नागरिकांना स्पष्टता हवी आहे. महापौर आणि महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

SCROLL FOR NEXT