मुंबई

जिल्ह्यातील सव्वाचार लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

CD

मुरबाड, ता. १ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, १ ते १९ वर्षे वयोगटातील तब्बल चार लाख ४१ हजार ४९६ बालकांनी जंतनाशक गोळ्यांचे सेवन केले. ३० ऑक्टोबरला ही मोहीम राबविण्यात आली. या दिवशी विविध कारणांमुळे गोळ्या घेऊ न शकलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबरला विशेष पूरक मोहीम राबविण्यात येणार आहे.
बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे, शारीरिक वाढ व विकासाला चालना देणे आणि जंतसंसर्गापासून संरक्षण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील १,५३६ शासकीय शाळा, ४०० खासगी शाळा आणि १,९५३ अंगणवाड्यांच्या माध्यमातून मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी १,४७७ आशा स्वयंसेविका, १,८५९ अंगणवाडी सेविका आणि १,४५९ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
मोहिमेत शासकीय शाळांमधील एक लाख ५२ हजार ७५३, खासगी शाळांमधील एक लाख दोन हजार ९०९ आणि अंगणवाड्यांमधील ७५ हजार १२७ बालकांना गोळ्या देण्यात आल्या. यामध्ये दोन लाख १७ हजार ३७ मुली आणि दोन लाख २४ हजार ४५९ मुलांचा समावेश आहे. उर्वरित बालकांनाही जंतनाशक गोळ्यांचा लाभ मिळावा, यासाठी ३ नोव्हेंबरला पूरक मोहीम राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT