मुंबई

खावडा वीज प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या

CD

भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : खावडा ४ सी हरित ऊर्जा प्रकल्पाच्या अति उच्चदाब वीजवाहिन्यांसाठी बाधित झालेल्या शेतजमिनींना वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.
खावडा पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडच्या लिलो ऑफ बाभळेश्वर-पडघे (एम) ४०० केव्ही डीसी लाईन (बोईसर-२) प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील २० गावांचा समावेश आहे. या परिसरात एमएमआरडीए, एमएसआरडीसी तसेच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे औद्योगिकीकरण व नागरीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे बाधित शेतजमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या वीज मनोऱ्यांसाठी बाधित जमिनीला प्रतिगुंठा सहा लाख ६० हजार रुपये, तर वीजवाहिन्यांच्या मार्गासाठी बाधित जमिनीला प्रतिगुंठा ९९ हजार रुपये मोबदला दिला जात आहे. या रकमेत मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच वीजवाहिन्यांच्या मार्गातील झाडांना योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली.
भिवंडी तालुक्यात वाढते औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शेतजमिनींवर परिणाम होत असून, भविष्यात शेतकरी भूमिहीन होण्याची भीती शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष भगवान सांबरे यांनी व्यक्त केली. बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

Dates & Coconut Ladoo: यंदाच्या दिवाळीत फराळात बनवा हटके पदार्थ! साखरेशिवाय तयार करा खजूर-नारळाचे पौष्टिक लाडू; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल!

Latest Marathi News Live Update : 'संविधानाला धक्का लागू देणार नाही!' फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

SCROLL FOR NEXT