भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात नारपोली पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत टेम्पोसह ५७ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालकाला अटक केली असून, त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती नारपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक समाधान चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालुक्यातील काल्हेर येथील अरिहंत कम्पाउंड परिसरात टाटा टेम्पोतून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नारपोली पोलिस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत संशयित टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केली. तपासणीत टेम्पोमध्ये प्रतिबंधित कमला पसंद आणि राजश्री पानमसाला असा ४२ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी चालक लियाकत साबिर अली (वय ३९, रा. उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. गुटख्यासह १५ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ५७ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अली याला अटक केली. त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.