नवी मुंबईत मंगळवारी १० तास पाणीपुरवठा बंद
मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम; बेलापूर ते ऐरोलीपर्यंतच्या विभागांना फटका
वाशी, ता. १ (बातमीदार) ः पालिकेकडून मुख्य जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटर बसविण्याची तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी मंगळवारी (ता. ३) सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १० तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सानपाडा, वाशी, बेलापूर आणि शिरवणे परिसरातील मुख्य जलवाहिन्यांवर विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. सानपाडा मोराज सर्कलजवळील मुख्य जलवाहिनीवर ४०० मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह, तर सानपाडा सेक्टर ३० येथील जलवाहिनीवर २५० मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे. वाशी सेक्टर १९ येथील सतरा प्लाझा जवळील मुख्य जलवाहिनीवर २५० मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह, तर सेक्टर २२ येथील मुख्य जलवाहिनीवर ७०० मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम होणार आहे. बेलापूर सेक्टर २८ येथील पंपहाउसला जोडणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या इनलेट जलवाहिनीवर तसेच सेक्टर १५ येथील किल्ला जंक्शनजवळील मुख्य जलवाहिनीवरही बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहेत. याशिवाय शिरवणे गावाजवळील मुख्य जलवाहिनीवर फ्लोमीटर बसविण्याचे काम केले जाणार आहे.
या कालावधीत बुधवारी (ता. ४) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरंदवाड यांनी केले आहे.
कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार?
बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.