दमखाडीचा नाला पुन्हा उभारणार
दिवाळीपूर्वी काम संपविण्याचे लोकप्रतिनिधींचे प्रयत्न; व्यापारी, वाहनचालकांना दिलासा मिळण्याची आशा
रोहा, ता. १ (बातमीदार) : जूनमधील महापुरात दमखाडी नाक्यावरील जयराम मार्केटसमोरील मुख्य नाला जमीनदोस्त झाल्याने रोहा-धाटाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला आता वेग आला आहे. दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याने व्यापारी, रहिवासी आणि वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
नाला खचल्यामुळे परिसरातील दुकानदार, ग्राहक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या समस्येची दखल घेत नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती महेश कोलटकर, स्थानिक नगरसेविका संजना शिंदे आणि नगरसेवक रोशन चाफेकर यांनी पाठपुरावा केला. त्यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे हा प्रश्न मांडला.
कामाला प्रशासकीय गती
खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिवाळीपूर्वी नाल्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सध्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पावसाळी नुकसानीचा धडा
महापुरामुळे नाला जमीनदोस्त झाल्याने या परिसरातील पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नाल्याचे बांधकाम दर्जेदार आणि पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन पूर्ण करणे आवश्यक आहे.
फोटो ओळ : दमखाडी येथील मुख्य नाल्याचे काम वेगाने सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.