‘विद्यादीप’मधून विद्यार्थ्यांना आधार
‘सकाळ NIE’ ॲपच्या शुल्कासाठी ५० टक्के आर्थिक मदत
पालघर, ता. १ : गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देतानाच डिजिटल शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पालघर आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयीन माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यादीप’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले असून, ‘सकाळ NIE’ या शैक्षणिक ॲपच्या वार्षिक शुल्कासाठी ५० टक्के आर्थिक साहाय्य देण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली...’ या विचारांचा वारसा जपत गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुकर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. शालेय साहित्याच्या उपलब्धतेसोबतच डिजिटल माध्यमातून ज्ञान मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष भूषण सावे, सचिव अमित अ. पाटील, असिस्टंट गव्हर्नर जयेश आव्हाड, एसव्हीपी कंपनीचे मॅनेजर अनिल बिलवा, उपाध्यक्ष तथा प्रकल्पप्रमुख मनिष पिंपळे, डिस्ट्रिक्ट कौन्सिलर रफिक लुलानिया आणि अमित आर. पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि डिजिटल शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने रोटरी क्लब ऑफ पालघरचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सातवी यांनी केले. या वेळी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.