मुंबई

ऑनलाइन सट्टेबाजीप्रकरणी सागर दाशला अटक

CD

ऑनलाइन सट्टेबाजीप्रकरणी सागर दाशला अटक
तीन गुन्ह्यांच्या तपासातून सट्टेबाजीचे आर्थिक जाळे उघड

अंधेरी, ता. १ (वार्ताहर) : ऑल पॅनेल एक्स्चेंज (एपीएक्स) या ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कथित ऑनलाइन बेटिंग आणि सायबर फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-२ ने सागर दाश याला अटक केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) मंगळवारी (ता. २७) ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने दाश याला तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

ईडीने तीन गुन्ह्यांच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यवहारांमधून मिळालेली रक्कम अनेक बनावट अथवा म्युल बँक खात्यांद्वारे वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेतील अनेक खात्यांमधून हा पैसा विविध शेल कंपन्यांकडे वळविण्यात आला, त्यानंतर या कंपन्यांमधील मोठ्या रकमा बंगळूर येथील नगरभावी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नोडल खात्यात जमा झाल्या. हे खाते सागर दाश याने स्थापन केलेल्या आर्मस्ट्राँग एक्स्चेंज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने चालविले जात असल्याचे तपासात आढळले आहे. सट्टेबाजी, ऑनलाइन मटका, सायबर फसवणूक, हवाला आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी विविध आर्थिक माध्यमांचा वापर केल्याचा आरोप याप्रकरणात करण्यात आला आहे.

शेकडो कोटींचा व्यवहार
नगरभावी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या केवायसी आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून सागर दाश याने क्रिप्टोकरन्सी खाते उघडल्याचेही तपासात उघड झाले आहे. या सहकारी संस्थेच्या बँक खात्याद्वारे सुमारे शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय आहे. यातील मोठी रक्कम ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सायबर फसवणूक करून मिळविलेल्या गुन्ह्यातील पैशांशी संबंधित असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणात समुंदरसिंग राठोड, मुकेश जैन, राम उर्फ रामधनी आणि सागर दाश यांची नावे समोर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT