मुंबई

गिरीधरची अधिकारीपदी झेप

CD

गिरीधरची अधिकारीपदी झेप

समेळपाड्यातील गिरीधर सुळेची अन्न व औषध प्रशासनात निवड

वसई, ता. २९ (बातमीदार) : स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार अपयश आले, काही गुणांनी संधी हुकली; मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नालासोपारा येथील समेळपाड्यातील गिरीधर बाबुराव सुळे याने अखेर यशाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागात ‘विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ (गट-ब)’ या पदावर त्याची मुंबई आयुक्तालयात निवड झाली आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या गिरीधरच्या या यशामुळे सुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

गिरीधरचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी आहे. २०१० मध्ये त्याचे कुटुंब वसई तालुक्यात स्थायिक झाले. त्याचे माध्यमिक शिक्षण नालासोपारा येथील के.एम.पी.डी. विद्यालयात, पुढील शिक्षण सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात, तर बी. फार्मसीचे शिक्षण वांद्रे येथे झाले. पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. गेल्या सहा वर्षांत राज्य उत्पादन शुल्क, पोलीस उपनिरीक्षक, राज्यसेवा आणि वन विभागाच्या विविध परीक्षांसाठी त्याने प्रयत्न केले. या काळात पाच ते सहा वर्षे फार्मसी अधिकारी म्हणूनही काम केले. अनेकदा थोडक्यात अपयश आले, तरी त्याने अभ्यासातील सातत्य सोडले नाही.
या प्रवासात वसई पश्चिमेतील पंचवटी परिसरातील डॉ. के. ब. हेडगेवार वाचनालयाची मोलाची साथ मिळाल्याचे गिरीधर सांगतो. वसई-विरार महापालिका, ग्रंथपाल अमित मोदी आणि माजी महापौर नारायण मानकर यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके आणि अभ्यासासाठी योग्य जागा उपलब्ध झाली. वाचनालयातील अभ्यासाने तयारीला दिशा मिळाल्याचे त्याने नमूद केले.
अन्न व औषध प्रशासन विभागात विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ म्हणून औषधांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणे, औषध कंपन्यांना भेटी देणे आणि विविध चाचण्या करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर असेल. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचेही गिरीधरने सांगितले.
गिरीधरचे वडील बाबुराव सुळे मुंबई महापालिकेत कार्यरत असून आई गंगुबाई गृहिणी आहेत. भाऊ कालिदास सुळे एसआरपीएफमध्ये सेवा बजावत आहे. कुटुंबाच्या पाठबळासह स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल गिरीधरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT