येऊरमधील पार्टीवर पोलिसांचा छापा
६० ते ७० तरुण-तरुणी ताब्यात; मद्य आणि ई-सिगारेटचे सेवन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १: येऊरमधील लायन पार्क बंगल्यात सुरू असलेल्या हॅलोवीन पार्टीवर वर्तकनगर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर छापा टाकला. या वेळी बंगल्यात ६० ते ७० तरुण-तरुणी आढळले. पार्टीत मद्य आणि ई-सिगारेटचे सेवन सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.
येऊर हिल स्टेशनवरील आश्रम रोड परिसरातील लायन पार्क बंगला विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिला जातो. शनिवारी रात्री येथे हॅलोवीन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रवेश शुल्क म्हणून प्रतिव्यक्ती दीड हजार रुपये आकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी छापा टाकला.
दरम्यान, येऊर परिसरातील बंगल्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत अशा पार्ट्यांचे आयोजन होत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः नववर्षाच्या स्वागतासाठी दोन महिने आधीपासून बंगले आरक्षित केले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली. रात्रीच्या वेळी वाहनांची वाढती वर्दळ आणि पार्ट्यांच्या आयोजनावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.