मुंबई

मूत्रपिंड रुग्णांना दिलासा

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : मूत्रपिंडाच्या आजारांमुळे नियमित डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांसाठी मुलुंडमधील श्रीमती मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयात १० खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू झाले आहे. पालिकेच्या या रुग्णालयात प्रथमच डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांना उपचारासाठी इतर रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. या केंद्रात विविध सत्रांमध्ये दररोज सुमारे ५० रुग्णांवर डायलिसिस करण्याची क्षमता आहे.

डायलिसिस केंद्र तिसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आले असून, त्याचे संचालन खासगी संस्थेच्या सहभागातून केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

योजनांमुळे उपचाराचा खर्च कमी
महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र रुग्णांना डायलिसिसचा लाभ घेता येणार आहे. संबंधित योजनांच्या निकषांनुसार उपचाराचा खर्च योजनेतून भागविला जाईल. योजनांच्या कक्षेबाहेरील रुग्णांसाठीही डायलिसिसची सुविधा तुलनेने कमी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मूत्रपिंड निकामी होण्याच्या अवस्थेतील अनेक रुग्णांना आठवड्यातून अनेक वेळा डायलिसिसची गरज असते. त्यामुळे नियमित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे ठरते.

सुविधांचा विस्तार
रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण डिसेंबर २०२५ मध्ये झाले होते. सध्या रुग्णालयात ११० खाटांची क्षमता असून, वैद्यकीय, शल्यचिकित्सा, अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, नेत्र, बालरोग, त्वचारोग आणि दंतरोग विभाग कार्यरत आहेत. रक्तदाब व मधुमेहासाठी तसेच प्रयोगशाळेची सुविधाही उपलब्ध आहे. रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. तसेच येत्या सहा महिन्यांत सीटी स्कॅन आणि एमआरआय सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

मुंबई : मुलुंडच्या पालिका रुग्णालयात दहा खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT