मुंबई

उल्हासनगरमध्ये बोनसवरून कामगारांचा एल्गार

CD

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : दिवाळीच्या तोंडावर उल्हासनगर महापालिकेतील बोनसचा वाद आता चांगलाच पेटला आहे. अवघ्या ५०० रुपयांची वाढ करून कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी प्रशासनाविरोधात संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. २५ हजार रुपयांच्या बोनससाठी ५ नोव्हेंबरला महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा कामगार नेते चरणसिंग टाक आणि सचिव राजेंद्र अडांगळे यांनी दिल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दिवाळी सानुग्रह अनुदानावरून प्रशासन आणि कामगार संघटनांमधील संघर्ष चिघळला आहे. महापौर अश्विनी निकम यांच्या मध्यस्थीनंतर १८ हजार ५०० रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला. मात्र, अवघ्या ५०० रुपयांच्या वाढीमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक आणि राजेंद्र अडांगळे यांनी महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि स्थायी समिती सभापतींना पत्र देत ५ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगत प्रशासनाने सुरुवातीला १८ हजार रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, कामगार संघटना २५ हजार रुपयांच्या मागणीवर ठाम आहेत.

अतिरिक्त कामांवर बहिष्काराचा इशारा
वर्षभर शहराच्या स्वच्छतेसह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा अवघ्या ५०० रुपयांची वाढ करून अपमान करण्यात आला आहे. दिवाळीनंतर नियमित कामकाजाच्या वेळेबाहेर कोणतीही अतिरिक्त कामे केली जाणार नाहीत. स्वच्छ भारत अभियानाच्या पथकांच्या भेटीदरम्यानही अतिरिक्त कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बोनसचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे असून प्रशासनापुढे कामगारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

Chhatrapati Shahaji Raje and Sambhaji Maharaj Samadhi Controversy : छत्रपती शहाजीराजे भोसले व थोरले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी मेघडंबऱ्या उभारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर कर्नाटक पोलिसांकडून गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT