मुंबई

महागाईने बदलली दिवाळी भेटींची चव

CD

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २ : दिवाळीच्या काळात मोठी मागणी असलेल्या सुकामेव्याच्या दरात यंदा १० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळी भेटींच्या पाकिटांमधील महागड्या काजू, बदाम आणि पिस्त्यांचे प्रमाण कमी करून व्यापाऱ्यांनी भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि चिया बियांचा समावेश वाढवला आहे.
सुकामेव्याच्या दरवाढीमुळे ग्राहकांचे दिवाळीचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दिवाळीपूर्वी पिस्त्याच्या दरात सर्वाधिक, म्हणजे ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या खारा पिस्ता दोन हजार रुपये किलो, तर हिरवा पिस्ता तीन हजार ते तीन हजार ५०० रुपये किलो दराने विकला जात आहे. बदामाच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली असून, नियमित बदामाचे दर एक हजार ते एक हजार ५०० रुपये किलो आहेत. प्रीमियम ममरा बदामाचे दर तीन हजार ते चार हजार ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. काजूचे दर ९०० ते एक हजार ६०० रुपये किलो असून, त्यात १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

अंजीराचे दर दोन हजार ते तीन हजार ५०० रुपये किलोवर स्थिर आहेत. अख्खा अक्रोड ७५० ते ९५० रुपये, तर अक्रोड मगज एक हजार ३०० ते दोन हजार रुपये किलो दराने विकला जात आहे. अक्रोडच्या दरातही १३ ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर झाला असून, दिवाळी भेटींचे स्वरूप बदलताना दिसत आहे.

फरसाण, चॉकलेटला पसंती
सुक्यामेव्याची खरेदी पूर्णपणे बंद न करता ग्राहकांनी प्रमाण कमी केले आहे. पूर्वी किलोभर सुकामेवा घेणारे ग्राहक आता अर्धा किलो किंवा २५० ग्रॅमवर समाधान मानत आहेत. भेटवस्तूंच्या संचात महागड्या सुकामेव्याऐवजी फरसाण आणि चॉकलेटला पसंती दिली जात आहे.

आयात खर्च वाढल्याचा परिणाम
सुकामेव्याची आवक घटणे, कॅलिफोर्नियातील बदाम उत्पादनात झालेली घट आणि कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे आयात खर्च वाढल्याचा परिणाम बाजारभावावर झाला असल्याचे व्यापारी सांगतात. इराण-अफगाणिस्तानमधील तणावाचाही पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

Chhatrapati Shahaji Raje and Sambhaji Maharaj Samadhi Controversy : छत्रपती शहाजीराजे भोसले व थोरले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी मेघडंबऱ्या उभारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर कर्नाटक पोलिसांकडून गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT