मुंबई

थाळचा निनाद, संस्कृतीचा हुंकार!

CD

थाळचा निनाद, संस्कृतीचा हुंकार!

लोकगीते आणि कथांच्या माध्यमातून आदिवासी अस्मितेचे जतन

जव्हार, ता. २ (बातमीदार) : निसर्गाशी अतूट नाते जपत संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा वारसा पिढ्यानपिढ्या जतन करणाऱ्या आदिवासी समाजाच्या जीवनात ‘थाळ’ वादनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. थाळच्या गंभीर निनादासोबत रात्रभर गायल्या जाणाऱ्या देव-देवतांच्या कथा, पूर्वजांच्या स्मृती आणि पारंपरिक लोकगीतांतून आदिवासी समाजाचा इतिहास, श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मिता आजही जिवंत ठेवली जात आहे. जव्हार तालुक्यातील ही अनोखी लोकपरंपरा आदिवासी संस्कृतीचा मौल्यवान ठेवा ठरत आहे.

थाळ हे केवळ वाद्य नसून आदिवासी समाजाच्या धार्मिक श्रद्धा, लोकविश्वास आणि मौखिक परंपरेचे प्रभावी माध्यम आहे. पितळ किंवा काश्याच्या धातूपासून तयार केलेल्या परातीसारख्या पात्राचा वादनासाठी वापर केला जातो. विशिष्ट पद्धतीने वाजवल्यानंतर त्यातून गंभीर आणि घुमणारा नाद निर्माण होतो. या नादाच्या साथीने सादर होणाऱ्या पारंपरिक गीतांमुळे संपूर्ण वातावरणात आध्यात्मिक चैतन्य निर्माण होते. आदिवासी समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात थाळ वादनाला विशेष स्थान आहे. थाळच्या निनादासोबत देव-देवतांच्या कथा, पूर्वजांच्या आठवणी आणि समाजजीवनाशी संबंधित पारंपरिक गीते गायली जातात. संध्याकाळी सुरू होणारा हा कथागायनाचा जागर अनेकदा रात्रभर सुरू असतो. या गीतांमधून सृष्टीविषयक संकल्पना, श्रद्धा, जीवनमूल्ये आणि पूर्वापार चालत आलेले ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते.
विशेष म्हणजे, लिखित स्वरूपात न आलेल्या अनेक लोककथा, ऐतिहासिक संदर्भ आणि सांस्कृतिक आठवणी या मौखिक परंपरेतून जतन झाल्या आहेत. ज्येष्ठांकडून गायली जाणारी गीते आणि सांगितल्या जाणाऱ्या कथांमुळे नव्या पिढीला आपल्या समाजाचा इतिहास आणि सांस्कृतिक ओळख समजण्यास मदत होते.
आदिवासी समाजातील काही समुदायांमध्ये मृत्यूनंतरच्या दशक्रिया विधीच्या आदल्या रात्री थाळ वादन करण्याची परंपरा आहे. या वेळी देव-देवतांच्या कथा, पूर्वजांच्या स्मृती आणि पारंपरिक गीतांचे गायन केले जाते. मृत व्यक्तीच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करण्यासोबतच दुःखात असलेल्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचे कामही या सामूहिक परंपरेतून होते. मृत्यूच्या दुःखद प्रसंगातही समाजाला एकत्र आणणारी ही परंपरा आदिवासी समाजातील श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि भावनिक बंधांचे दर्शन घडवते.

मौखिक परंपरेच्या जतनाचे आव्हान
आधुनिक जीवनशैलीचा वाढता प्रभाव आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे पारंपरिक लोककला व मौखिक कथनपरंपरा जतन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. थाळ वादन जाणणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचे अनुभव नोंदवणे, पारंपरिक गीतांचे ध्वनिमुद्रण करणे आणि तरुण पिढीला या कलेचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातूनही या लोककलेला व्यापक व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. थाळचा निनाद हा केवळ वाद्याचा आवाज नसून तो पूर्वजांच्या स्मृती, समाजाची श्रद्धा आणि पिढ्यान्पिढ्यांच्या सांस्कृतिक अनुभवांना जोडणारा धागा आहे. या परंपरेचे जतन म्हणजे आदिवासी समाजाच्या समृद्ध लोकजीवनाचा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे होय, असे धानोशी येथील थाळवादक मंगळा चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: यंदाच्या दिवळीत फक्त ग्रीन फटाके फोडण्यासच सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; वेळेची मर्यादाही केली निश्चित

Patan Leopard Attack: घरात टीव्ही पाहत बसलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, पाटण तालुक्यात खळबळ, महिला भांडी घासत हाेती अन्..

Maharashtra District Courts Bomb Threat : न्यायव्यवस्था हादरली! पुण्याच्या शिवाजीनगरसह राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने मोठी खळबळ

Palghar Court: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमक्या! पालघर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण परिसर रिकामा

Maharashtra Drought: महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९५ टक्के कमी पाऊस; मराठवाडा कोरडा, दुष्काळाचे संकट आणखी गडद

SCROLL FOR NEXT