लोकशाही दिनात तीन तक्रारींचे तातडीने निवारण
पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे मार्गदर्शन
पनवेल, ता. २ (बातमीदार) : नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पनवेल पालिकेतर्फे सोमवारी (ता. २) मुख्यालयातील बैठक कक्षात लोकशाही दिन पार पडला. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात विविध विभागांशी संबंधित तीन अर्ज दाखल झाले. संबंधित तक्रारींची दखल घेत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या.
नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात आणि त्यांचे वेळेत निराकरण व्हावे, या उद्देशाने महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनाला विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते. दाखल झालेल्या तीन अर्जांवर संबंधित विभागांनी कार्यवाही करून तक्रारदारांना दिलासा दिला. या वेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त स्वरूप खारगे, शहर अभियंता राजेश कर्डिले, उपअभियंता विलास चव्हाण, सामान्य प्रशासन विभागप्रमुख कीर्ती महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही दिनासाठी अर्ज कसा करावा?
महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारींचे अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे किमान १५ दिवस आधी सादर करावेत. तसेच अर्जदारांनी लोकशाही दिनाच्या दिवशी स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.