इस्माईल युसूफ महाविद्यालयात मुलींचे वसतिगृह
३२० विद्यार्थिनींची सोय; १५० फुटांचा राष्ट्रध्वज उभारणार
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील ऐतिहासिक इस्माईल युसूफ महाविद्यालयात ३२० निवास क्षमता असलेले मुलींचे वसतिगृह आणि १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रस्तावाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी या मागण्यांसाठी २०२० पासून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी नुकतीच मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
महाविद्यालयात सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, परगावाहून उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थिनींच्या निवासाची अडचण लक्षात घेऊन ३२० प्रवेश क्षमतेचे वसतिगृह उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी यापूर्वी १३.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता; मात्र पुढील कार्यवाही रखडली होती. आता बांधकामासाठी निधी आणि प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेतून १५० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात येणार आहे. निधी उपलब्ध न झाल्यास खासदार निधीतून काम करण्याची तयारी वायकर यांनी दर्शविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.