मुंबई

आप्पापाड्यात नागरी समस्यांचा भडका

CD

आप्पापाड्यात नागरी समस्यांचा भडका
एमएमआरडीए, एसआरए, पालिकेविरोधात बेमूदत उपोषण
मालाड, ता. ३ (बातमीदार) : मालाड पूर्वेतील आप्पापाडा परिसरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी विधानसभा विभाग अध्यक्ष ॲड. भास्करभाऊ परब यांनी सोमवारपासून (ता. २) आमरण उपोषण सुरू केले आहे. आनंदनगर रिक्षा स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सुरू असलेल्या या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
एमएमआरडीए, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), मुंबई महापालिका, वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत ॲड. परब यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, परिसरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रमुख मागणी आहे.
एमएमआरडीए आणि एसआरएच्या माध्यमातून विकसित इमारतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत संबंधित कामांची आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक इमारतीपर्यंत पक्के रस्ते तयार करावेत, वन विभागाने हद्दी निश्चित कराव्यात आणि वनक्षेत्रातील पात्र झोपडीधारकांचे नियमानुसार पुनर्वसन करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या मागण्यांवर काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांचा आंदोलनाला पाठिंबा
आप्पापाडा परिसरातील नागरिकांनी ॲड. परब यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित नागरी समस्यांवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांची दखल घ्यावी आणि ठोस कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

SCROLL FOR NEXT