शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्तआयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. ५) शहापूर पंचायत समितीच्या आवारात बेमुदत उपोषणाचा इशारा बळीराज सेनेने दिला आहे. संघटनेचे शहापूर तालुका संपर्कप्रमुख दशरथ भोईर यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे.
बिरवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्यांनी बदली कारणास्तव कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३ मार्च २०२५ला बिरवाडी ग्रामपंचायतीचा कार्यभार हस्तांतरणाचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामसेवकाला हे आदेश ५ मार्च २०२५ ला प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतीच्या दप्तरी चार्जची प्रक्रिया ८ मार्च २०२५ ला पार पडली. दरम्यान, ५ ते ८ मार्च २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून १४ लाख ६७ हजार ५७५ रुपयांच्या रक्कमेचा आर्थिक व्यवहार करण्यात आला आहे. त्याला बळीराज सेनेने संदिग्ध व्यवहार संबोधून आक्षेप घेतला आहे. तसेच, गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. समितीचा अहवाल प्राप्त झालेला असताना त्यावर कार्यवाही केली जात नसल्याने अखेर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण केले जाणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.