मुंबई

बौद्ध वस्त्यांच्या प्रश्नांसाठी रिपाइंचा गावोगावी दौरा

CD

वज्रेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील बौद्ध वस्त्यांमधील प्रलंबित समस्या जाणून घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या ठाणे जिल्हा आणि भिवंडी तालुका पदाधिकाऱ्यांनी गावोगावी प्रत्यक्ष भेटी देण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात दिघाशी येथील समाजमंदिराचा प्रलंबित प्रश्न आणि आवळे गावातील पाणीसमस्येची दखल घेण्यात आली.
दिघाशी येथील बौद्ध वस्तीत पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समाजमंदिराच्या प्रश्नावर ग्रामसेवक उदय गगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी ग्रामसेवकांनी या कामासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळ आणि ग्रामस्थांना दिले. तसेच आवळे गावातील बौद्ध वस्तीत पाण्याची समस्या असल्याचे ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रश्नाचा शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा करून तो सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. तालुक्यातील विविध गावांमधील बौद्ध वस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी पक्ष संघटनेने नियोजन केल्याचे आवळे येथील बैठकीत सांगण्यात आले.
दौऱ्यात रिपाइंचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, भिवंडी तालुकाध्यक्ष भरत जाधव, तालुका उपाध्यक्ष योगेश भोईर, तालुका सरचिटणीस नारायण जाधव, विभागीय सहसचिव सुनील जाधव, महापोली शाखाध्यक्ष आदेश भोईर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. या भेटींमुळे बौद्ध वस्त्यांमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT