मुंबई

कारची काच फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

CD

अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) : अंबरनाथ पश्चिमेतील उल्हासनगर-अंबरनाथ मार्गावरील टाइम स्क्वेअर परिसरात चोरट्यांनी उभ्या कारची काच फोडून सहा लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये अडीच लाख रुपयांची रोकड आणि पाच महागड्या मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी उल्हासनगर येथील सुशील चांदवानी (वय ४८) यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चांदवानी यांचा मोबाईल आणि सुगंधी द्रव्य विक्रीचा व्यवसाय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास चांदवानी यांनी आपली कार अंबरनाथ पश्चिमेतील डी-मार्टजवळील रागा कॉम्प्लेक्स येथील नमो चाय दुकानासमोर उभी केली होती. कारमधील करड्या रंगाच्या पिशवीत अडीच लाख रुपये आणि पाच मोबाईल ठेवून ते पत्नी व मुलांसह जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री साडेबाराच्या सुमारास ते कारजवळ परतले असता, मागील उजव्या दरवाजाची काच फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कारमधील रोकड आणि मोबाईल असलेली पिशवीही गायब होती. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT