मुंबई

जंगलतोड विरोधात मोखाड्यातील चिमुकल्यांचा संदेश.

CD

जंगल वाचविण्याची चिमुकल्यांची हाक
पेंडकेवाडीच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण संवर्धनाबद्दल जनजागृती

मोखाडा, ता. ३ (सकाळ वृत्तसेवा) : जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा बिघडणारा समतोल आणि निसर्गापुढील वाढती आव्हाने लक्षात घेऊन मोखाडा तालुक्यातील पेंडकेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जंगल संवर्धनाचा संदेश दिला आहे. इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जनजागृतीपर रीलची सध्या परिसरात चर्चा होत आहे. लहान वयातच पर्यावरण रक्षणाची जाणीव असलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून मोठ्यांनाही निसर्ग संवर्धनाचा धडा दिला आहे.

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीच्या घटनेनंतर जंगल संवर्धनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर पेंडकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील जंगलाचे महत्त्व अधोरेखित करणारी रील तयार केली. जंगल म्हणजे केवळ झाडांचा समूह नसून पाणी, वन्यजीव आणि मानवी जीवनाचा तो महत्त्वाचा आधार आहे, हे त्यांनी या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

जंगलतोड झाल्यास पर्जन्यमानावर परिणाम होऊ शकतो, वन्यजीवांचा अधिवास नष्ट होऊ शकतो आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू शकतो, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. झाडे तोडण्याऐवजी त्यांचे संरक्षण करावे, वृक्षारोपण करावे आणि लावलेल्या रोपांचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘जंगल वाचवा, निसर्ग वाचवा, आपले भविष्य सुरक्षित ठेवा’, हा त्यांच्या संदेशाचा मुख्य आशय आहे.

शिक्षक रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पेंडकेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाचे पंचक्रोशीत कौतुक होत असून, इतर शाळांनाही पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची प्रेरणा मिळत आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवीगार जंगले आणि स्वच्छ पर्यावरण टिकवायचे असेल, तर केवळ जनजागृती न करता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज या चिमुकल्यांनी अधोरेखित केली आहे.

पर्यावरणाचा धडा
डोंगर-दऱ्या आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजते. त्याच अनुभवाला जनजागृतीची जोड देत त्यांनी पर्यावरण रक्षणाचा विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला आहे. जंगलाचे संरक्षण ही केवळ शासन किंवा वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी होणे गरजेचे आहे, हा संदेश त्यांच्या उपक्रमातून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT