मुंबई

दिवेआगरमध्ये पाणी वापरावर निर्बंध

CD

दिवेआगरमध्ये पाणी वापरावर निर्बंध
पर्यटन व्यावसायिकांनाही नियमावली लागू; स्विमिंग पूल, रेन डान्स बंद करण्याचे आदेश
श्रीवर्धन, ता. ३ (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर दिवेआगर ग्रामपंचायतीने पाणीटंचाई रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. भूगर्भातील पाणीसाठा आणि कार्ले नदीची पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने दवंडी देऊन ग्रामस्थांसह पर्यटन व्यावसायिकांसाठी पाणी वापराबाबत नियमावली जाहीर केली आहे. सरपंच विजय तोडणकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे नळ पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. खासगी विहिरींची पुरेशी सोय नसलेल्या भागांत १५ मिनिटे, तर विहिरींची सोय असलेल्या भागांत ३० मिनिटे पाणीपुरवठा कमी केला जाणार आहे. वैयक्तिक नळजोडणीला विद्युत मोटार लावून पाणी भरणाऱ्यांची जोडणी कायमस्वरूपी बंद करून दंड आकारण्यात येईल. नवीन विहिरी खोदणे तसेच जुन्या विहिरींची खोली व पाणी उपसण्याची क्षमता वाढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पर्यटन सुविधांवरही निर्बंध
- हॉटेल, होम स्टे, लॉजिंग आणि खाणावळ चालकांना पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या खोल्यांमध्ये ठरावीक वेळेतच पाणीपुरवठा करावा, तसेच वाहने व परिसर धुण्यासाठी पाणी वापरू नये, असे निर्देश आहेत. नवीन व्यावसायिक बांधकामांनाही बंदी घालण्यात आली आहे. स्विमिंग पूल आणि रेन डान्स चार दिवसांत बंद करण्याचे आदेश असून, उल्लंघन केल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
- कार्ले नदीतील पाणी गढूळ किंवा दूषित होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन सरपंच विजय तोडणकर यांनी केले आहे. नागरिक आणि व्यावसायिकांनी पाण्याचा जपून वापर करून सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT