मुंबई

ठाणे शहरात बेकायदा पिस्तुलांचा सुळसुळाट

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : शहरात बेकायदा अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. कोपरी, मुंब्रा आणि रेतीबंदर परिसरात केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. आतिश मिसाळ (वय २३), रोहन हजारे (२६) आणि अरफात शेख (२३) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या शस्त्रांची एकूण किंमत ८८ हजार आहे.

कोपरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री आनंदनगर बोगद्याजवळ सापळा रचून आतिशला पकडले. त्याच्या कमरेला देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळला. त्याने चार दिवसांपूर्वी मुंब्रा येथून पाच हजारांना खरेदी करत, कोपरी परिसरात विक्रीसाठी आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने रेतीबंदर परिसरात कारवाई केली. चितळसर पोलिसांनी हद्दपार केलेला रोहन हजारे हा ठाणे शहरात आढळून आला. त्याच्या झडतीत १५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. हे शस्त्र विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, मध्यरात्रीनंतर मुंब्रा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अरफात शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT