पुस्तकांची दिवाळी उपक्रमाला वाचनप्रेमींचा प्रतिसाद
कोपरखैरणे, ता. ३ (बातमीदार) : पालिकेच्या वतीने रविवारी (ता. १) वाशी येथील राजीव गांधी उद्यान येथे ‘पुस्तकांची दिवाळी’ हा विशेष उपक्रम राबण्यात आला. दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासोबतच नागरिकांचे सार्वजनिक उद्यानांशी नाते अधिक दृढ व्हावे आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. या उपक्रमात शंभरहून अधिक वाचनप्रेमींनी सहभाग नोंदविला.
दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच नागरिकांचे सार्वजनिक उद्यानांशी नाते अधिक दृढ व्हावे, उद्यानांबद्दल आपलेपणाची भावना निर्माण व्हावी आणि वाचनाची आवड जोपासली जावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी सहभागी नागरिकांनी आपल्या आवडीची पुस्तके सोबत आणून उद्यानातील निसर्गरम्य वातावरणात सामूहिक वाचनाचा आनंद घेतला. दिवाळी या पारंपरिक उत्सवाला ज्ञान, माहिती आणि वाचनाची जोड देत महापालिकेने एक वेगळी संकल्पना नागरिकांसमोर मांडली. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या काळात पुस्तकांशी पुन्हा नाळ जोडण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाली. सामूहिक वाचनामुळे उद्यानातील वातावरणही ज्ञानमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. सार्वजनिक उद्याने ही केवळ विरंगुळ्याची ठिकाणे नसून, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रेही बनू शकतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी उद्यानासारख्या सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुस्तकांची दिवाळी’ या उपक्रमाचे सहभागी नागरिकांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.