मुंबई

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांची चिंता

CD

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
नागरिकांमध्ये आरोग्याची चिंता; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) ः हिवाळ्याची चाहूल लागताच शहरात डासांच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली आहे. शहरातील विविध भागांत, उद्याने, करमणुकीची ठिकाणे तसेच खाडीकिनारी डासांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. यामुळे मलेरिया आणि डेंगी यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःच्या घरासह परिसराची स्वच्छता ठेवावी आणि आठवड्यातून किमान एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
दरवर्षी हिवाळा सुरू होताच डासांच्या प्रजननाला पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे डासांची संख्या वाढून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. विशेषतः मोकळ्या जागा आणि करमणुकीच्या ठिकाणी डासांचे थवे दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबईतील भौगोलिक परिस्थितीही डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत आहे. शहरातील अनेक नाल्यांमध्ये साचलेले पाणी, खाडीकिनारे आणि कांदळवन परिसर यामुळे डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण तयार होते. खाडीकिनारी साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होत असल्याने शहरात केवळ हिवाळ्यातच नव्हे, तर वर्षभर डासांचा त्रास जाणवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
घरांमध्ये पाणी साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यांमध्ये, टाक्यांमध्ये तसेच इतर साहित्यामध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. मलेरिया आणि डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांची पैदास रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाण्याची भांडी, टाक्या आणि पाणी साठणारे साहित्य रिकामे करून स्वच्छ धुवावे. त्यानंतर ते पूर्णपणे कोरडे ठेवावे. घराच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून जनजागृती शिबिरे
डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमार्फत सातत्याने जनजागृती शिबिरांचे आयोजन केले जाते. विविध जातींच्या डासांची उत्पत्ती कशी होते, त्यापासून कोणते आजार पसरतात आणि डासांची पैदास रोखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारी पत्रकेही प्रसिद्ध केली जात आहेत.

घरामध्ये पाणी साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी आणि इतर साहित्य स्वच्छ करून पूर्णपणे कोरडे ठेवावे. यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होईल.
- डॉ. वसंत माने, वैद्यकीय अधिकारी, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT