मुंबई

रेशनच्या धान्यात माती-खड्यांचा भरणा

CD

रेशनच्या धान्यात माती-खड्यांचा भरणा
गरिबांच्या आरोग्याशी खेळ;
चेंबूर, गोवंडी, मानखुर्दसह पूर्व उपनगरांत निकृष्ट धान्याचा पुरवठा
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः चेंबूर, गोवंडी, मानखुर्दसह पूर्व उपनगरांतील अनेक शिधावाटप दुकानांतून वितरित होणाऱ्या गहू आणि तांदळात माती, खडे तसेच अन्य कचरा आढळत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. धान्य स्वच्छ करताना महिलांची दमछाक होत असून, ऐन दिवाळीत गरिबांच्या ताटातच निकृष्ट धान्य पडत असल्याने शिधावाटप विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर, टिळकनगर, गोवंडी, शिवाजीनगर, देवनार, माहुल, ट्रॉम्बे, वाशीनाका, गडकरी खाण आदी परिसरांत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी वसाहती आहेत. याशिवाय कुर्ला, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील अनेक कुटुंबेही रेशन व्यवस्थेवर अवलंबून आहेत. या भागांतील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर चालत असल्याने रेशनमधून मिळणारे धान्य त्यांच्या दैनंदिन गरजेचा महत्त्वाचा आधार आहे. चेंबूर व टिळकनगर परिसरात सुमारे ५२, तर गोवंडी-शिवाजीनगर परिसरात १०० हून अधिक शिधावाटप दुकाने आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रेशन दुकानांतून मिळणाऱ्या गहू आणि तांदळात माती, लहान-मोठे खडे तसेच अन्य कचरा आढळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घरी आणलेले धान्य वापरण्यापूर्वी निवडावे आणि स्वच्छ करावे लागत असल्याने महिलांचा बराच वेळ त्यात खर्च होत आहे.
रेशनचे धान्य आम्ही मोफत मिळते म्हणून घेत नाही; त्यासाठी पैसे मोजतो, मात्र घरी आणल्यानंतर तांदळातील खडे आणि माती वेगळी करावी लागते. गहू निवडण्यात तर अर्धा दिवस जातो. गरीब माणसाने स्वच्छ धान्याची अपेक्षाही करू नये का? रेशन दुकानदार आणि पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिला ग्राहकाने व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित विभागाने या तक्रारींची तातडीने दखल घेऊन रेशन दुकानांतील धान्याचे नमुने तपासावेत. गोदामापासून ते लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करावी आणि निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. येत्या आठ दिवसांत या समस्येचे निराकरण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महिला संघटनांनी दिला आहे.

परराज्यांतून शिधावाटपासाठी धान्याचा पुरवठा केला जातो, मात्र गोदामात साठवणूक करताना धान्य खराब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुकानदारांना धान्य चाळून त्यातील माती व इतर कचरा काढून लाभार्थ्यांना वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- हरिष पटेल,
चेंबूर शिधावाटप अधिकारी, कार्यालय क्रमांक २१


आम्ही गरीब कुटुंबातील असल्याने सरकारकडून मिळणाऱ्या रेशनच्या धान्यावर आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, मात्र गहू आणि तांदळात माती, खडे आणि कचरा आढळत असेल, तर हे धान्य खायचे कसे?
- सलमा शेख, ग्राहक


धान्य योग्य प्रकारे स्वच्छ न करता खाल्ल्यास पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी अशा धान्याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. महादेव गारळे, शल्‍यचिकित्सक, केईएम रुग्णालय

दिवाळीतच पर्यावरणाची आठवण येते का? दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह यांच्यावर भाजपचा हल्लाबोल...

Gold-Silver Price Crash: धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! उच्चांकापासून सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त

पतंजलीवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, २,२७९ लिटर गाईचे तूप FDAकडून जप्त; चुकीचे लेबलिंग अन् भेसळीचा संशय

Prajakta Mali: 'पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत तू...' प्राजक्ता माळीची क्रांती रेडकरसाठी खास पोस्ट; म्हणाली...

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

SCROLL FOR NEXT