मुंबई

ठाणे पालिका कर्मचारी २५ हजार सानुग्रह अनुदानावर नाराज

CD

सानुग्रह अनुदानाचा तिढा
३० हजारांच्या मागणीसाठी म्युनिसिपल लेबर युनियनचे धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना जाहीर झालेले सानुग्रह अनुदान कमी असल्याने कामगार संघटना आक्रमक झाली आहे. दिवाळीसाठी जाहीर केलेले २५ हजार रुपयांचे अनुदान अमान्य करत म्युनिसिपल लेबर युनियनने ३० हजार रुपयांची मागणी केली आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने परस्पर निर्णय घेतल्याचा आरोपही युनियनने केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. ५) महापालिका मुख्यालयासमोर दोन तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ३० ऑक्टोबरला केली होती, मात्र युनियनने त्यापूर्वीच ३० हजार रुपयांची मागणी केली होती. या मागणीवर चर्चा न करताच कमी रकमेची घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात युनियनचे अध्यक्ष रवी राव, कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाले, सरचिटणीस चेतन आंबोणकर आणि कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे. गुरुवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

सानुग्रह अनुदानाबरोबरच कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोपही युनियनने केला आहे. १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, शैक्षणिक भत्ता, वैद्यकीय विमा आणि विविध भत्त्यांमधील वाढ याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीचा हिशेब देण्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सानुग्रह अनुदानाच्या रकमेवरून सुरू झालेला वाद हा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे निर्माण झालेल्या व्यापक असंतोषाचे प्रतिबिंब असल्याचे चित्र आहे.

चौकटी
नवी मुंबईला ४५ तर ठाण्यात तुलनेने कमी
सानुग्रह अनुदानाच्या रकमेत ठाणे महापालिका अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत मागे असल्याचा दावा युनियनने केला आहे. नवी मुंबई महापालिकेने ४५ हजार, पनवेलने ३५ हजार ५००, मुंबईने ३३ हजार, नाशिकने ३१ हजार ५०० आणि पिंपरी-चिंचवडने ३० हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. खोपोली आणि उरण नगरपालिकांनीही प्रत्येकी ३५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या तुलनेत ठाणे महापालिकेचे २५ हजार रुपयांचे अनुदान कमी असल्याने प्रशासनाने फेरविचार करून किमान ३० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस चेतन आंबोणकर यांनी केली आहे.

धरणे आंदोलनाचा इशारा
५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत ठाणे महापालिका मुख्यालयासमोर म्युनिसिपल लेबर युनियनचे धरणे आंदोलन होणार आहे. २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अमान्य करत ३० हजार रुपयांची मागणी संघटनेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीतच पर्यावरणाची आठवण येते का? दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह यांच्यावर भाजपचा हल्लाबोल...

Gold-Silver Price Crash: धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! उच्चांकापासून सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त

पतंजलीवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, २,२७९ लिटर गाईचे तूप FDAकडून जप्त; चुकीचे लेबलिंग अन् भेसळीचा संशय

Prajakta Mali: 'पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत तू...' प्राजक्ता माळीची क्रांती रेडकरसाठी खास पोस्ट; म्हणाली...

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

SCROLL FOR NEXT