मुंबई

बोधगयेत रंगणार आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सोहळा

CD

मुंबई, ता. ४ : तथागत गौतम बुद्धांची ज्ञानभूमी असलेल्या बिहारमधील बोधगया येथे पहिल्यांदाच २१वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक पठण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या २ ते १२ डिसेंबरला महाबोधी महाविहार परिसरात हा महासोहळा रंगणार असून, जगभरातील २७हून अधिक देशांतील सुमारे २५ हजार बौद्ध अनुयायी यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅटिंग कौन्सिलचे सरचिटणीस भन्ते विनय रक्खिता यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी सदस्य अमन कांबळे, डॉ. विजय कदम उपस्थित हाेते. २००६मध्ये सुरू झालेल्या या जागतिक परंपरेचे यजमानपद पहिल्यांदाच भारताला मिळत असल्याने हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

सोहळ्याच्या उद्‍घाटनाला बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरण रिजिजू यांच्यासह अनेक मान्यवरही सहभागी होतील. या आयोजनामुळे बौद्ध सर्किट पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेत सुमारे २५ कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे संचालक वांग्मो डिक्सी यांनी सांगितले.

जगभरातील बौद्ध अनुयायी हाेणार सहभागी
या दहा दिवसीय सोहळ्यात म्यानमार, थायलंड, भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि बांगलादेश यांसह अमेरिका, जपान, जर्मनी, मलेशिया, इंडोनेशिया, कोरिया आणि भूतान अशा २७हून अधिक देशांतील भिक्षू-भिक्षुणी आणि उपासक सहभागी होतील.

मुंबई : भन्ते विनय रक्खिता यांनी आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सोहळ्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार मुंबईतील ब्रीजकँडी रुग्णालयात दाखल

Pune News: CSR निधीतून सुविधा देऊन खासगी बँकांकडून कोट्यवधींच्या ठेवींची जुळवाजुळव? अनास्करांची RBI कडे तक्रार

Jalna News: तहसीलदारांसमोरच लिपिक अन् कोतवाल भिडले! अंबड तहसील कार्यालयात फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT