मुंबई

ठाणे स्थानकांच्या सुविधांत भर

CD

ठाणे स्थानकाच्या सुविधांत भर
एस्केलेटरसह मोफत शौचालयाचे गुरुवारी लोकार्पण
ठाणे, ता. ३ (सकाळ वृत्तसेवा) : ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन सरकता जिना (एस्केलेटर) आणि अद्ययावत मोफत शौचालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे. फलाट क्रमांक ५ आणि ६ वरील प्रवाशांसाठी सीएसएमटी दिशेकडील पादचारी पुलावर (एफओबी क्रमांक १) एस्केलेटर उभारण्यात आला आहे. तर फलाट क्रमांक २ येथे डी मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आधुनिक शौचालय ब्लॉक तयार करण्यात आला आहे. या दोन्ही सुविधांचे गुरुवारी (ता. ५) सकाळी ११.३० वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

ठाणे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. गर्दीच्या वेळेत फलाटांवर जाण्यासाठी आणि तेथून बाहेर पडताना जिन्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता नवीन एस्केलेटरमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. विशेष म्हणजे एस्केलेटर उभारताना अस्तित्वातील जिन्याचा वापर सुरू राहील, याचीही काळजी घेण्यात आली आहे. जुन्या जिन्याच्या दोन्ही बाजूंना डेकची व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांना जिना आणि एस्केलेटर असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, फलाट क्रमांक २ वरील नवीन शौचालय प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. डी मार्ट फाउंडेशन आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उभारण्यात आली आहे. या शौचालयात स्वच्छतेसाठी २४ तास कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत. पाणी, वीज, ड्रेनेज आणि देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाकडे असेल. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि विनामूल्य शौचालयाची सुविधा मिळणार आहे.

या उपक्रमांतर्गत यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भायखळा, घाटकोपर आणि कल्याण रेल्वे स्थानकांवरही नवीन शौचालये सुरू करण्यात आली आहेत. ठाणे स्थानकातील या दोन सुविधांमुळे प्रवाशांना फलाटांवर जाण्यासाठी अतिरिक्त पर्याय आणि स्वच्छतागृहाची मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.

खासदारांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी एस्केलेटर आणि अद्ययावत शौचालय उभारणीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून या दोन्ही सुविधांची उभारणी पूर्ण झाली असून, गुरुवारी त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT