मुंबई

डोंबिवलीत हत्येचा धक्कादायक उलगडा

CD

मृत मित्र स्वप्नात आल्याने हत्येची कबुली
आरोपी स्वतः पोलिसात हजर; डोंबिवलीतील घटनेत दोघांना अटक
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली. प्रभू करकडे याने विशाल कदमला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात विशालचा मृत्यू झाला. यानंतर घरमालक संदेश म्हात्रे याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून खाडीजवळील निर्जनस्थळी फेकून दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर २० दिवसांनी मृत मित्र स्वप्नात येऊ लागल्याने मानसिक तणावात आलेल्या प्रभूने स्वतः ठाणे गुन्हे शाखेच्या सेंट्रल युनिटमध्ये हजर होत हत्येची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी संदेश म्हात्रेलाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल आणि प्रभू हे मित्र होते. दोघेही दारूच्या पार्टीसाठी एकत्र आले असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या प्रभूने विशालला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात विशालचा मृत्यू झाला. हत्या झाल्यानंतर घाबरलेल्या प्रभूने घरमालक संदेशच्या मदतीने विशालचा मृतदेह गोणीत भरला आणि तो खाडीजवळील निर्जनस्थळी फेकून दिला होता. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT