मुंबई

‘डीपी वर्ल्ड’चा नेत्रसेवा उपक्रम

CD

‘डीपी वर्ल्ड’चा नेत्रसेवा उपक्रम

मुंबई, ता. ३ : व्यावसायिक चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासह रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी डीपी वर्ल्डने भारतातील १२ हजार व्यावसायिक चालक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्रसेवा कार्यक्रमाचा विस्तार केला आहे. व्हिजनस्प्रिंग फाउंडेशनच्या भागीदारीत हा उपक्रम राबवण्यात येणार असून, त्याअंतर्गत चालकांची मोफत नेत्रतपासणी करून गरजूंना चष्मे दिले जाणार आहेत. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर येथे या विस्तारित उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच कोची, दिल्ली आणि कोलकता येथेही नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

गुजरातमध्ये २०२५ मध्ये राबवलेल्या या उपक्रमांतर्गत नऊ हजार व्यावसायिक चालक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली होती. त्यापैकी पाच हजार २०० हून अधिक जणांना चष्मे देण्यात आले. तपासणी केलेल्या ६१ टक्के चालकांमध्ये दृष्टिदोष आढळला होता. विशेष म्हणजे, चष्मे मिळालेल्यांपैकी ९४ टक्के जण पहिल्यांदाच चष्मा वापरणार होते. विस्तारित उपक्रमांतर्गत प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून डोळ्यांची सर्वंकष तपासणी केली जाणार आहे. दृष्टिदोष असलेल्या चालकांना मोफत चष्मे दिले जातील. तसेच मोतीबिंदू आणि काचबिंदूसारख्या आजारांची लक्षणे आढळल्यास संबंधितांना पुढील उपचारांसाठी सरकारी किंवा धर्मादाय आरोग्य संस्थांकडे पाठवले जाणार आहे. डोळ्यांचे आरोग्य जपणे आणि दृष्टिदोषाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

व्यावसायिक चालक हे देशाच्या वाहतूक आणि पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग आहेत, मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे त्यांना नियमित नेत्रतपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे बंदरे, गोदामे आणि वाहतूक केंद्रांवरच नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. चालकांच्या आरोग्यातील गुंतवणुकीमुळे रस्ते सुरक्षा वाढण्यासह मालवाहतुकीची विश्वासार्हताही बळकट होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT