मुंबई

पुन्हा घुमणार लोककलेचा थाट

CD

पुन्हा घुमणार लोककलेचा थाट
मुंबईकरांच्या आग्रहास्तव होणार ‘द फोक आख्यान’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईकरांच्या खास आग्रहास्तव ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे समृद्ध लोककलेचा नवा आविष्कार असलेल्या ‘द फोक आख्यान’ ३० नोव्हेंबरला पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. शीव येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा थाट रंगणार आहे.
महाराष्ट्रात १२ कोसावर जशी बोलीभाषा बदलते, त्याच पद्धतीने लोककलेची परंपरा, बाज, सादरीकरण आणि थाटही बदलतो. या लोककलेची पालखी खांद्यावर घेतलेल्या लोककलावंताचे ध्येय हे केवळ मनोरंजन नाही, तर मराठी संस्कार, परंपरा, संस्कृती यांना चिरंजीवी ठेवण्याचे आहे. मौखिक परंपरेचे अमृत प्राशन करून मराठी लोककला कित्येक शतके या मातीशी आणि माणसाच्या मनाशी नाळ जोडून जीवित आहे; पण एखादी सभ्यता किंवा संस्कृती जशी परकीय आक्रमणात इतिहास होऊन जाते, अगदी तेच चित्र या लोककलेच झाले. काही संस्कारशून्य पाश्चात्यकलेचे गारुड या मराठी लोककलेवर आणि लोकमनावर पसरले. त्यामुळे मराठी लोककलेचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुण कलाकार पुढे आले आहेत. आख्यानकलेचा मार्ग निवडून त्यांनी गणापासून गोंधळापर्यंतच्या लोककलांसाठी नव्या रचना आणि चाली तयार करण्याचा प्रयत्न आहे. मराठी लोककलेला पुन्हा मान-सन्मान आणि लोकाश्रय मिळवून देण्याच्या उद्देशाने हे कलाकार कार्यरत आहेत. ‘द फोक आख्यान’ हा त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे.
----
कलाविष्काराचे बहारदार सादरीकरण
तरुण आणि तडफदार कलाकारांचे खड्या आवाजातील गायन, आख्यान, खुमासदार निवेदन आणि तालबद्ध संगीताच्या साथीने हा कार्यक्रम रंगणार आहे. नव्या उमेदीचे कलाकार आपल्या बहारदार सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. पारंपरिक वेशभूषा, तडफदार आणि खुमासदार संवादफेक, तसेच वाद्यांची जुगलबंदी, अशा विविध कलाविष्कारांनी आख्यान अधिक रंगतदार होणार आहे.
----
मोजकीच तिकिटे शिल्लक
शीव येथील षण्मुखानंद सभागृहात ३० नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता रंगणाऱ्या ‘द फोक आख्यान’च्या थाटाची मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत. तिकीट आरक्षित करण्यासाठी ticketkhidakee.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा.
----
क्यूआर कोड - MUM26F56745

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

SCROLL FOR NEXT