मुंबई

‘पु. ल. देशपांडे दिनदर्शिका २०२७’

CD

टीकेला सामोरे जाण्याऐवजी टीकाकारांवर बंधने!
राज ठाकरे : ‘पु. ल. देशपांडे दिनदर्शिके’चे प्रकाशन
मुंबई, ता. ३ : व्यंगचित्रकाराचे म्हणणे समजून घेणे आणि त्यावर योग्य प्रतिक्रिया देणे, ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. व्यंगचित्रकार, पत्रकार किंवा संपादक हे कोणाचे शत्रू नसतात. सध्या मात्र टीकेला सामोरे जाण्याऐवजी टीका करणाऱ्यांवरच बंधने आणण्याचे प्रकार घडत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. व्यंगचित्रकार आलोक यांनी विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून साकारलेल्या ‘पु. ल. देशपांडे दिनदर्शिका २०२७’चे प्रकाशन आज प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात राज यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
गेल्या दहा-बारा वर्षांत व्यंगचित्रकारांनी सरकारच्या विरोधात व्यंगचित्र काढू नये, पत्रकारांनी विरोधात लिहू नये, संपादकांनी वेगळी भूमिका मांडू नये, अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती योग्य नाही. प्रत्येक जण आपापली भूमिका मांडत असतो. त्यांचे म्हणणे समजून घेणे आणि त्यावर योग्य पद्धतीने प्रतिक्रिया देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे; मात्र सध्या टीकेला सामोरे जाण्याऐवजी टीका करणाऱ्यांवरच बंधने आणण्याचे प्रकार घडत असल्याचे राज यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी व्यंगचित्रकार मंजुल यांचा उल्लेख करीत त्यांना वर्तमानपत्रातून काढून टाकण्यास भाग पाडल्याचा संदर्भ दिला. व्यंगचित्रकार काय सांगू इच्छितो, हे समजून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अनेक व्यंगचित्रे काढली होती; मात्र नेहरू यांनी त्याच व्यंगचित्रकाराला ‘माय बेस्ट विशेस टू द कार्टूनिस्ट’ अशी स्वाक्षरी देऊन कौतुक केले होते. टीका आणि विरोध याकडे कसे पाहावे, याचे हे उदाहरण असल्याचे राज म्हणाले.
आलोक यांची व्यंगचित्रांचे दिनदर्शिकेत रूपांतर करण्याची कल्पना अभिनव असल्याचे सांगत यामुळे नव्या पिढीला पु. ल. देशपांडे यांची पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. आलोकने बेधडकपणे व्यंगचित्रे काढत राहावे, त्यांची पुस्तके प्रकाशित करावीत आणि प्रदर्शनांचे आयोजन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी ‘सकाळ’चे समूह संपादक नीलेश खरे, मुख्य संपादक राहुल गडपाले, ज्येष्ठ साहित्यिक प्रफुल्ल वानखेडे, लेखक अरविंद जगताप, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मिराजदार यांनी केले. या वेळी राज ठाकरे यांना पु. ल. देशपांडे यांचा थ्रीडी प्रिंटिंगद्वारे तयार केलेला पुतळा भेट देण्यात आला.
---
पु.लं.च्या आवाजाने अधिक जोडलो!
आलोक यांनी पु. ल. देशपांडे यांच्यावरील प्रेमातून ही संकल्पना सुचल्याचे सांगितले. दिनदर्शिकेत पु.लं.चे २४ किस्से व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. पु.लं.च्या पुस्तकांपेक्षा ध्वनिचित्रफितींमधून ऐकलेल्या आवाजाने आणि सादरीकरणाच्या शैलीने आपल्याला अधिक जोडले, असे आलोक यांनी सांगितले.
---
समाजाला हास्याची गरज!
नीलेश खरे यांनी हास्य, कला, विनोद आणि व्यंगचित्रे ही सुसंस्कृत समाजाची लक्षणे असल्याचे सांगितले. पुढील वर्षातही समाजाला हास्याची गरज भासणार असून, ही दिनदर्शिका ती गरज पूर्ण करेल, असे ते म्हणाले. अरविंद जगताप यांनीही ‘सकाळ’मधून चांगले व्यंगचित्र रोज वाचायला मिळत असल्याची भावना व्यक्त केली. प्रफुल्ल वानखेडे यांनी या दिनदर्शिकेला साहित्य, चित्रकला आणि विनोद यांचे सुंदर व्यासपीठ असे संबोधले. आधुनिक डिजिटल साधनांच्या काळातही घरातील दिनदर्शिकेचे महत्त्व कायम असल्याचे सांगत आलोकचा हा प्रयोग नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ! सणासुदीतही ग्राहकांचा ठेंगा; धक्कादायक कारण काय? सहा वर्षांत पहिल्यांदाच...

IND vs NZ 1st ODI Live : शुभमन गिलचा आत्मघातकी निर्णय? ५ फलंदाज, ४ जलदगती गोलंदाज अन् २ ऑलराऊंडरसह टीम मैदानात

IPL 2027 Trade : हार्दिक पांड्याची चर्चा सुरू असताना सूर्यकुमार यादवच्या ट्रेडचा 'बाऊन्सर' पडला; Mumbai Indians ने काय निर्णय घेतला?

Maharashtra Rain : दिवाळीला धोधो कोसळणार ! 'या' १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; विजांच्या कडकडाटासह सरींची शक्यता, ‘मुरासू’ चक्रवादळही निवळणार

Vaibhav Sooryavanshi ला फक्त १५ व्या वर्षी उपकर्णधार करणे योग्य आहे? सचिन तेंडुलकरने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर, 'खूपच घाई...'

SCROLL FOR NEXT