मुंबई

एन. शिवराज मैदानाच्या दुरवस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष

CD

धारावी, ता. ४ (बातमीदार) : संत कक्कय्या मार्गावरील एन. शिवराज मैदानाच्या दुरवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील उद्यान विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या परिसराला अवकळा आली असून, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नवीन म्युनिसिपल चाळीसमोरील हे हक्काचे मैदान गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय उदासीनतेचा बळी ठरले आहे. यामुळे मैदानातील समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा महापालिकेवर धडक देण्याचा इशारा धारावी नागरिक समिती व अन्य संघटनांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही या मैदानात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. विसर्जनानंतर तलाव हटविण्यात आला; मात्र त्यासाठी खोदलेला खड्डा व्यवस्थित बुजविण्यात आलेला नाही. त्यामुळे मैदानात मातीचा मोठा ढिगारा निर्माण झाला असून, खेळण्यासाठी जागाच राहत नाही. लहान मुले याच ढिगाऱ्यावर खेळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

याशिवाय मैदानातील खेळाचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने मैदान असुरक्षित बनले आहे. १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी रिकामी पडून आहे. वृक्षांना नियमित पाणी दिले जात नाही, तसेच मैदानात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

दिवाळीपूर्वी मैदानातील समस्या सोडवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा धारावीकर महापालिकेवर धडकतील. उद्भवणाऱ्या परिस्थितीला महापालिका व संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही समितीने दिला आहे.


नागरिक समितीचे प्रशासनाला निवेदन
या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव दिलीप गाडेकर यांच्यासह अलका साबळे, गिरीराज शेरखाने, गोविंद भोईटे, जयराम सदाफुले, सरिता शेरखाने आणि दत्ता खंदारे यांनी संबंधित लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

धारावी : एन. शिवराज मैदानाची दुरवस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Latest Marathi News Live Update : ५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवाच! हर्षवर्धन सपकाळांचे मंत्र्यांना खुले आव्हान

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Pune News: CSR निधीतून सुविधा देऊन खासगी बँकांकडून कोट्यवधींच्या ठेवींची जुळवाजुळव? अनास्करांची RBI कडे तक्रार

SCROLL FOR NEXT