मुंबई

नियोजन, पारदर्शकतेतून ग्रामीण विकासाला गती द्या

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : गावांच्या विकासासाठी केवळ योजनांची यादी तयार करून चालणार नाही, तर उपलब्ध निधी, संसाधने आणि लोकसहभागाच्या बळावर विकासकामे प्रत्यक्षात उतरवावी लागतील. ग्रामपंचायतींच्या कामकाजात नियोजन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणत ग्रामीण विकासाला गती द्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची यंत्रणा सक्रिय करण्याच्या दृष्टीने मंगळवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.

ठाण्यातील टेंभीनाका येथील बी. जे. हायस्कूल सभागृहात झालेल्या कार्यशाळेत यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतींनी उपलब्ध संसाधनांचा विनियोग करताना केवळ नियमित कामकाजावर समाधान न मानता गावाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा तयार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. अभियान यशस्वी करायचे असेल तर लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वयासह लोकसहभागाची मजबूत साखळी निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, कार्यशाळेत अभियानाचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. सिंगापूर आणि डोहाळे ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आणि राज्य समन्वयक श्रीधर कुलकर्णी यांनीही अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, सरपंच आणि ग्रामपंचायत यंत्रणेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

जबाबदारीने काम करा!
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानाकडे गांभीर्याने पाहून उद्दिष्टपूर्तीसाठी कालबद्ध नियोजन करावे, असे आवाहन यादव यांनी केले. सरपंचांपासून ग्रामविकास अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी जबाबदारीने काम करावे. विकासकामांमध्ये समन्वयाचा अभाव किंवा नियोजनातील त्रुटींना थारा न देता गावांच्या प्रगतीला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ambegaon News: आंबेगावकरांना दिलासा! पाणी-चारा टंचाई निवारणासाठी जून २०२७ पर्यंतचा आराखडा तयार; ६५ टँकरची तयारी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या पदयात्रेमुळे नागपूर ठप्प; दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी

SCROLL FOR NEXT