ठाणे, ता. ४ : खोपट येथील फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या झुनझुनवाला कुटुंबाच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घरात यापूर्वी केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. बिना झुनझुनवाला (५९) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
झुनझुनवाला यांच्या ८७ वर्षीय सासूची प्रकृती खालावल्याने ५ ऑक्टोबरपासून नीलम पटेल (३४) ही महिला पूर्णवेळ केअरटेकर म्हणून कामाला होती. २४ ऑक्टोबरला तिला कामावरून कमी करण्यात आले. दरम्यान, २७ ऑक्टोबरला सासरे कपाटातील ड्रॉव्हर उघडण्यासाठी गेले असता सामान अस्ताव्यस्त असल्याचे आणि दागिने ठेवलेली पर्स पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता रोख दहा हजार रुपये, सोनसाखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि चांदीच्या दोन वाट्या गायब असल्याचे आढळले. चोरीला गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत चार लाख ९० हजार रुपये आहे. घरातील संबंधित खोलीत केअरटेकर महिलेलाच अधिक वेळ प्रवेश असल्याने तिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. आधार कार्डची प्रत गहाळ झाल्याने तक्रार करण्यास विलंब झाल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.