उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : पाच निरपराध श्वानपिल्लांना लाथा मारून हाकलल्यानंतर कार्टन बॉक्समध्ये कोंबून निर्जनस्थळी सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे. या पाच पिल्लांपैकी तीन पिल्ले सापडली असून, उर्वरित दोन अद्याप बेपत्ता आहेत. याप्रकरणी फ्लिपकार्टच्या व्यवस्थापकासह टेम्पोचालकाविरोधात उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक एकमधील महात्मा फुले चौक परिसरातील कोहिनूर प्राईम इमारतीच्या तळमजल्यावर फ्लिपकार्टचे दुकान आहे. या दुकानाजवळ असलेल्या पाच श्वानपिल्लांना क्रूर वागणूक दिल्याचे उघड झाले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून २९ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत या पिल्लांना लाथा मारून हाकलण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पाचही पिल्लांना कार्टन बॉक्समध्ये कोंबून टेम्पोतून अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील चांदणी ढाब्याजवळ नेले. तेथे त्यांना निर्जनस्थळी सोडून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या पाच पिल्लांपैकी तीन पिल्ले सापडली असून उर्वरित दोन पिल्लांचा अद्याप शोध लागलेला नाही. याप्रकरणी कल्याण येथील राजेंद्र कौर राजपूत (४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिश्रा आणि टेम्पोचालक महेश लांडगे यांच्याविरोधात उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उल्हासनगर पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.