मुंबई

दिवाळी खरेदीला वेग

CD

दिवाळी खरेदीला वेग
आकर्षक दिवे, तोरणे, फुलांच्या माळा, रांगोळीच्या साच्यांनी बाजारपेठ सजली
रजनीकांत साळवी ः सकाळ वृत्तसेवा
प्रभादेवी, ता. ४ (बातमीदार) ः दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने दादर बाजारपेठेत सणाच्या खरेदीची लगबग वाढली आहे. दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या, नव्या शैलीतील डेकोरेटिव्ह रांगोळ्यांचा साचा, मनमोहक फुलांच्या माळा तसेच घराचे दरवाजे आणि परिसर सजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगीबेरंगी स्टिकर्सनी बाजारपेठ सजली आहे. या आकर्षक सजावटीच्या साहित्याकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जात असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
यंदा पारंपरिक पणत्यांसोबतच विविध रंग, आकार आणि नक्षीकाम असलेल्या सजावटीच्या पणत्यांचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात रांगोळी काढण्यासाठी नव्या डिझाइनमधील डेकोरेटिव्ह रांगोळ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. कमी वेळेत आकर्षक रांगोळी साकारता यावी, यासाठी तयार डिझाइनच्या रांगोळ्यांनाही विशेष मागणी आहे.
दिवाळीच्या सजावटीत फुलांचे महत्त्व लक्षात घेता कृत्रिम तसेच रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक माळा, तोरणे आणि विविध सजावटीचे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले आहे. घराचे मुख्य प्रवेशद्वार, भिंती आणि परिसर सजविण्यासाठी आकर्षक स्टिकर्सचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. पारंपरिक सजावटीसोबत आधुनिक डिझाइनचा मिलाफ साधणाऱ्या या वस्तू ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहेत.
घरात व घराबाहेर लावण्यात येणारे सुंदर असे दिवे, सुगंध देणारे डिझाईन केलेल्या डबीतील दिवे सेलवरचे दिवे ग्राहकांचे लक्ष केंद्रित करत आहेत, तर दरवाजाला लावण्यात येणाऱ्या अगदी खऱ्या फुलांसारख्या वाटणाऱ्या फुलांच्या माळा, तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. एकंदरीत, दिवाळीनिमित्त दादर बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची रेलचेल पाहायला मिळत असून, घराघरांत दिवाळीचा आनंद आणि उत्साह निर्माण करण्यासाठी ग्राहकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे.

असे आहेत दर
पणत्यांची किंमत २० रुपयापासून ते १००, २००, डेकोरेटिव्ह दिवे ४०० ते ७०० रुपये, डेकोरेटिव्ह रांगोळीचा साचा १०० रुपये ते ५०० रुपये, फुलांच्या माळा आणि तोरणे १०० रुपये ते ४०० रुपायंपासून विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Politics: अमेरिकेतील निकालांमुळे 'उजव्यां'ना धक्का? 'जागतिक राजकारणात अति-उजव्या लाटेचा प्रभाव ओसरतोय..!' कोणी केला दावा?

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या विजयी मिरवणुकीत राडा! पंचायत समिती सदस्याला मारहाण, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; मुदतवाढ मागितल्याने आयुक्तांचे वेतन गोठवले, ५ लाखांचा दंड व अवमान नोटीस

दिवाळीनंतर या ५ राशींचं नशीब चमकणार! शुक्र मार्गी होताच आर्थिक अडचणी दूर होणार

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंसमोर शेतकऱ्यांचा संताप! ५ हजारांची मदत ७० टक्के शेतकऱ्यांना मिळालीच नाही; फायनान्स कंपन्यांचाही तगादा

SCROLL FOR NEXT