मुंबई

तुर्भे रेल्वेस्थानकासमोरील स्कायवॉकचा मार्ग मोकळा

CD

तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील स्कायवॉकचा मार्ग मोकळा
सुरेश कुलकर्णी यांच्या पाठपुराव्यानंतर दोन ते तीन दिवसांत कामाला प्रारंभ
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडताना पादचाऱ्यांना भेडसावणारा अपघातांचा धोका कमी करण्यासाठी तात्पुरता स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने येत्या दोन ते तीन दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. रखडलेल्या उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
तुर्भे रेल्वे स्थानक परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होते. ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला असून, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
या समस्येची दखल घेत सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरता पादचारी पूल उभारण्याची त्यांनी मागणी केली. तसेच परिसरात पुरेशी विद्युत रोषणाई आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचनाही केली.

अधिकाऱ्यांकडून पाहणी
कुलकर्णी यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत ठाणे-बेलापूर मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी पादचाऱ्यांच्या अडचणी आणि अपघातांचा धोका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर तात्पुरत्या स्कायवॉकचे काम दोन ते तीन दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mixed Gender Cricket Tournament : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! मुलं आणि मुली खेळणार एकाच टीममधून; 'हा' नवा विचित्र नियम पाहून चक्रावून जाल!

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Agniveers Extension: अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ! कायम लष्करी सेवेत सामील होण्याची पुन्हा संधी मिळणार

IND vs NZ: 'चेस मास्टर' विराटचा वाढदिवसाआधीच धुमाकूळ! सचिन - पाँटिंगला मागे टाकत रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Mangalwedha Farmers: दिवाळीपूर्वी मंगळवेढ्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना दिलासा; खात्यावर ३४ कोटी ६३ लाख जमा, ८ हजार अजून प्रतीक्षेत!

SCROLL FOR NEXT