मुंबई

अंबाडी नाका, वज्रेश्वरीत खरेदीचा उत्साह

CD

वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी, गणेशपुरीसह मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या अंबाडी नाका येथे दिवाळीच्या खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रांगोळी, पणत्या, आकाशकंदील आणि फटाक्यांनी बाजारपेठा सजल्या असून, रात्री उशिरापर्यंत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
यंदा बाजारपेठेत पारंपरिक मातीच्या पणत्यांसह शंख, मडकी आणि तुळशीच्या आकारातील रंगीबेरंगी पणत्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मणी आणि खड्यांनी सजवलेल्या या पणत्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. लहान मातीच्या पणत्यांची विक्री ५० रुपये डझन, तर मोठ्या पणत्यांची विक्री १०० रुपये डझन दराने होत आहे. मातीच्या पणत्यांसोबतच चिनी मातीच्या पणत्याही बाजारात दाखल झाल्या असून, त्यांची विक्री ५० रुपये जोडी दराने केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पणत्यांच्या किमतीत ३० रुपयांनी वाढ झाल्याचे अंबाडी नाका येथील विक्रेते अशोक जाधव यांनी सांगितले.
आकाशकंदिलांच्या प्रकारांतही यंदा विविधता पाहायला मिळत आहे. चिनी बनावटीच्या कंदिलांसह पारंपरिक पद्धतीने तयार केलेले कागदी, प्लॅस्टिक आणि कापडी कंदील बाजारात उपलब्ध आहेत. साधे कंदील १२० ते ८०० रुपये, तर नक्षीकाम केलेले सुबक कंदील ३०० ते एक हजार रुपये दराने विकले जात आहेत. वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांकडून प्रामुख्याने कागदी आणि प्लॅस्टिकच्या कंदिलांना पसंती दिली जात आहे.

रांगोळीचे दर स्थिर
यंदा रांगोळी आणि ती काढण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर स्थिर आहेत. एक ग्लास रांगोळी दहा रुपये दराने विकली जात आहे. तसेच गेरू, रांगोळी चाळण, ठिपक्यांच्या बाटल्या, रांगोळीचे साचे आणि तयार रांगोळ्यांचे दरही दहा ते २० रुपयांच्या दरम्यान आहेत.

सजावटीच्या साहित्याला मागणी
दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी यंदा नावीन्यपूर्ण वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळत आहे. पितळी दिव्यांच्या थाळ्या, मण्यांनी सजवलेले दिवे ठेवण्याचे आधार, सुगरणीच्या खोप्याच्या आकारातील पणतीधारक, विजेवर चालणारे दिवे, विविध प्रकारची तोरणे, झुंबरे आणि काचेचे कंदील अशा आकर्षक वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. या सजावटीच्या वस्तू १०० ते एक हजार रुपये दरम्यान उपलब्ध असून, घराला वेगळे रूप देण्यासाठी नागरिकांकडून त्यांची खरेदी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Ambegaon Farmers: आंबेगावातील ११०१ शेतकऱ्यांना मोठा आधार! २ हजार ९५ किलो देशी बियाण्यांचे मोफत वाटप

Pali News: पालीकरांचा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा! आधी विकासाचा हिशेब द्या, मगच घरपट्टी वाढवा; नागरिक आक्रमक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

SCROLL FOR NEXT