मुंबई

डॉक्टर मारहाण प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण;

CD

नगरसेवक रमेश म्हात्रेंचा
कारागृहातील मुक्काम वाढला
डॉक्टर मारहाण प्रकरण; ७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : डॉक्टरांना मारहाण प्रकरणात अटकेतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे. कल्याण न्यायालयात जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपींनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रमेश म्हात्रे यांचा आधारवाडी कारागृहातील मुक्काम वाढला आहे, तर या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरला होणार आहे.
या प्रकरणात म्हात्रे यांच्यासह अन्य पाच आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. मंगळवारी (ता. ४) या अर्जांवर सुनावणी झाली. या वेळी फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी युक्तिवाद करताना, प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष पूर्ण होईपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी केली. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही संदर्भ दिला. या प्रकरणात मदतनीस, मावशी यांच्यासह तीन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष अद्याप नोंदविण्यात आलेली नाही. या साक्षीदारांचे जबाब खटल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे फिर्यादी पक्षाने न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता, मात्र त्यानंतर आरोपींच्या वतीने जामीन अर्ज मागे घेण्यात आले.

साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया
महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा जामिनासाठी अर्ज करता येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या खटल्यात आतापर्यंत २० साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली असून, आणखी सुमारे ४० साक्षीदारांची साक्ष बाकी आहे. त्यापैकी १५ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

Pune News: चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर; 'या' परीक्षांची होणार चौकशी?

SCROLL FOR NEXT