मुंबई

सिध्दीविनायक ट्रस्टच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

CD

सिद्धिविनायक ट्रस्टच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

मुंबई, ता. ४ : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मंदिरालगतची राम मॅन्शन सहकारी गृहनिर्माण संस्था खरेदी केली आहे. या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. ४) मान्यता देण्यात आली. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी ही सहकारी गृहनिर्माण संस्था खरेदी केली आहे. या संस्थेचे क्षेत्र ७०८ चौरस मीटर आहे. यामध्ये १३ सदनिका आणि सात व्यावसायिक गाळे आहेत. या २० सदनिका खरेदी करण्यासाठी ९४ कोटी ११ लाख ६५,५५० रुपयांस मान्यता देण्यात आली आहे. या जागेचा वापर भाविकासाठी रांग व्यवस्थापन, प्रसादालय, स्वयंपाकगृह, यात्रीनिवास आणि मर्यादित वाहनतळ करण्यासाठी केला जाणार आहे. या खरेदी व्यवहारासाठी दोन कोटी ३२ लाख ३८,७०० रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावा लागला असता, मात्र लोकहितास्तव हे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.


पालघर जिल्ह्यात तीन ग्राम न्यायालये
मुंबई उच्च न्यायालयाच्या ग्राम न्यायालय स्थापना समितीने तलासरी, विक्रमगड आणि मोखाडा येथे ग्राम न्यायालय स्थापन करण्याबाबत केलेल्या शिफारशीनुसार पालघर जिल्ह्यातील तलासरी, मोखाडा, विक्रमगड येथे ग्राम न्यायालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच त्यासाठी आवश्यक असणाऱ्या १५ पदांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. तीनही ठिकाणी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एक, लघुलेखक एक, वरिष्ठ लिपिक एक, कनिष्ठ लिपिक एक, बेलिफ कम शिपाई एक अशी पाच पदे प्रत्येक न्यायालयासाठी मंजूर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर; 'या' परीक्षांची होणार चौकशी?

Festive Inflation: दिवाळीपूर्वी 'अमूल'चा ग्राहकांना दणका, तूप-बटर महागले; काय आहेत नवे दर?

Latest Marathi News Live Update : ५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवाच! हर्षवर्धन सपकाळांचे मंत्र्यांना खुले आव्हान

Eknath Shinde Sanatan Martand Award : वाराणसी येथील 'संस्कृती संसद २०२६' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च 'सनातन मार्तंड' पुरस्कार प्रदान

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT