सहर शेख यांच्या विरोधात मुंब्र्यात आंदोलन
पोस्टसंदर्भात जाहीर माफीची भाजप युवा मोर्चाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरून एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पोस्टचा निषेध करण्यासाठी मुंब्रा येथे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सहर शेख यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. माफी न मागितल्यास त्यांना ठाणे महापालिकेत प्रवेश करू देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्याच्या इतिहासाने पावन झालेल्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे गौरवीकरण करणे हा महापुरुषांच्या इतिहासाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान असल्याची भूमिका भाजप युवा मोर्चाने मांडली. औरंगजेबाच्या जयंतीनिमित्त सहर शेख यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमुळे जनभावना दुखावल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. मुंब्रा येथे झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहर शेख यांच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी संबंधित ध्वज आणि एमआयएमच्या पक्षध्वजाचे प्रतीकात्मकरीत्या फाडून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे ठाणे शहराध्यक्ष समर्थ नायक, सरचिटणीस अण्णासाहेब पिसाळ, मंडळ अध्यक्ष नाझिया तांबोळी, उपाध्यक्ष सोहेल शेख, युवती प्रमुख खुशबू रावल यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.