मुंबई

धारावीच्या चामड्याला मंदीचा फटका

CD

धारावीच्या चामड्याला मंदीचा फटका
दिवाळीत ग्राहकांची गर्दी ओसरली; दुकानदारांसह कारागीरही आर्थिक संकटात
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. ५ : धारावीत चामड्याच्या वस्तू स्वस्त व चांगल्या मिळतात. यामुळे देश-विदेशातून ग्राहक येथे येतात. दिवाळीत तर चामड्याच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांना गर्दीला आवरता-आवरता नाकी नऊ व्हायचे मात्र, यंदाची दिवाळी सुनीसुनी जात आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानात चामड्याच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत, मात्र दुकानात ग्राहकच फिरकत नसल्याने दुकानदार चिंतित झाले आहेत.
गेल्‍या अनेक वर्षांपासून धारावीतील दुकानदार दिवाळी चांगली जाईल, या आशेने दुकान सजवून ग्राहकांची वाट पाहत आहेत, पण अजूनही खरेदीसाठी ग्राहक येत नाहीत. त्‍यामुळे दुकानदार दुकानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकान उघडून ग्राहकांची वाट पाहत बसून असतात. पूर्वी मोठ्या कंपन्या आगाऊ सूचना देऊन त्यांना हवे असलेल्या चामड्याच्या वस्तू बनवून घेत असत. त्यामुळे दुकानदारांना घसघशीत नफा होत होता. त्यामुळे दुकानदार चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्या कामगारांकडून वस्तू बनवून घेण्यासाठी धावपळ करत असत.
सध्या एकूणच बाजारात मंदीचे वातावरण असल्याने किरकोळ ग्राहक सुद्धा दुकानाकडे फिरकत नाहीत. मोठ्या ऑर्डर तर मिळणे दुरापास्त झाले आहे. धारावीतील संत रोहिदास मार्गावर मोठ्या प्रमाणावर चामड्याच्या वस्तू विक्रीची दुकाने आहेत. सायन वाहतूक पूल बंद होता. म्हणून या दुकानदारांना नुकसान सहन करावे लागले होते. आता पूल खुला झाल्याने व्यवसाय चांगला होईल अशी आशा दुकानदारांना होती, मात्र ती फोल ठरली आहे.
अनेक दुकानदार हे दुकान भाड्याने घेऊन व्यवसाय करत आहेत. दुकानात किमान दोन नोकर ठेवावे लागतात, मात्र सध्या दुकानदारांना नोकरांचे वेतन, दुकानाचे भाडे, वीजबिल भरणे अवघड झाले आहे. दिवाळीत व्यवसाय होत नसल्याने चामडे विक्री करणारे, चामड्याच्या वस्तू बनवणारे कारागीर यांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मी गेल्‍या अनेक वर्षांपासून चामड्याच्या वस्तू विक्री करणारे दुकान चालवत आहे. दरवर्षी दिवाळीत जेवायला व घरी जायला वेळ मिळत नसायचा, मात्र यावर्षी सर्वच गणित बिघडले आहे. जीएसटीमुळे मोठ्या कंपन्या व व्यापारी माल उचलत नाहीत. त्यात दुष्काळ आणि एकूणच मंदीमुळे आमचा धंदा बसला आहे. मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
- राम भिवा कोकणे, मालक, ओम साई ब्रँड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Jogi IAS to Chief Minister : राजीव गांधींच्या एका फोन कॉलवर IAS नोकरी सोडून राजकारणात प्रवेश करणारे अजित जोगी पुढे कसे बनले काँग्रेसचे सर्वात मोठे बंडखोर?

नाहीतर ते आज जिवंत असते... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या 'त्या' दोन गोष्टी, कसा झालेला त्यांचा मृत्यू?

Pakistan Army: आंदोलनकर्त्यांवर थेट बॉम्ब फेकले! पाककडून आपल्याच जनतेवर भीषण हल्ला; सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

SCROLL FOR NEXT