भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक निवडून आल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, पालिकेची सर्वसाधारण महासभा दरमहा घेतली जात नसल्याने नागरी समस्यांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिकेची महासभा दरमहा घ्यावी; तसेच विषयपत्रिकेवरील विषयांवरील चर्चेपूर्वी नागरिकांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र एक तास राखीव ठेवावा, अशी मागणी नगरसेवक खान अब्दुल रहमान ऊर्फ सद्दाम भाई यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीचे पत्र नगरविकास विभागाचे मुख्य सचिव आणि महानगरपालिका प्रशासन संचालक यांनाही पाठविण्यात आले आहे.
महासभेची वेळ दुपारनंतर ठेवली जात असल्याने सायंकाळी सभा आटोपती घेतली जाते. त्यामुळे नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याऐवजी महासभेची वेळ सकाळी ११ वाजता ठेवून सुरुवातीचा एक तास सर्वसाधारण चर्चेसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या राखीव वेळेत नगरसेवकांना पाणीटंचाई, गटारे, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, रस्ते, पथदिवे, सार्वजनिक शौचालये, महिला सुरक्षा आणि महापालिका शाळांच्या समस्यांवर थेट चर्चा करता येईल. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना महासभेत प्राधान्य मिळून त्यांची सोडवणूक करण्यास मदत होईल, अशी भूमिका सद्दाम भाई यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.