बाजारात चॉकलेटची चलती
भाववाढीने ग्राहकांचा कल बदलला; गिफ्ट पॅकची बाजारात धूम
वाशी, ता. ५ (बातमीदार) ः दिवाळीसाठी बाजारात मिठाईच्या दुकानांत गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरू झाली असली, तरी मिठाईचे भाव गगनाला भिडल्याने खरेदी करताना सर्वसामान्यांची गणिते बिघडत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिठाईच्या भावात किलोमागे तब्बल २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत मिठाई खरेदी कशी करावी, असा प्रश्न ग्राहकांना पडला असून, दुसरीकडे दीर्घ टिकाऊपणामुळे मिठाईपेक्षा चॉकलेट्सना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पूर्वी दिवाळीत घरी तयार केलेला फराळ शेजारी व नातेवाइकांना देण्याची आपली सुंदर परंपरा होती, मात्र काळासोबत ही परंपरा काहीशी थंडावली असून, त्याजागी कॉर्पोरेट गिफ्ट संस्कृती रुजताना दिसत आहे. मित्रमंडळी व स्नेहींना भेटवस्तू देण्यासाठी मिठाईपेक्षा चॉकलेट्सचा टिकाऊपणा अधिक सुटसुटीत वाटत असल्याने कौटुंबिक स्तरावरही चॉकलेट गिफ्ट देण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये फ्लेवर, रंगरुपांतील चॉकलेटचे आकर्षक गिफ्टपॅक खरेदीदारांना भुरळ पाडत आहे. विविध आकाराच्या खोक्यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात हे चॉकलेट बांधून दिले जत आहेत. चॉकलेटची चलती लक्षात घेऊन दुकांनामध्येही त्यांचीच रेलचेल दिसून येत आहे. काही बेकरीवाले घरातच चॉकलेट बनवत असून महिला बचत गटाच्या माध्यामातून देखील चॉकलेट बनवण्यात येत आहे.
मिठाईचे भाव गगनाला :
पेढा : सफेद पेढा ५०० रु./किलो, केसर व मलाई पेढा ६०० रु./किलो
बर्फी ः पिस्ता व मलाई बर्फी ६०० रु./किलो, काजू कतरी : ८०० रुपये प्रति किलो.
विशेष मिठाई: चोकोबार रोल ६०० रु./किलो; तर कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्री आणि मॅगो अशा फळांच्या आकारातील ड्रायफ्रूट मिठाई एक हजार रुपये किलो भावाने विकली जात आहे.
लाडू व इतर : मोतीचूर व चुरमा लाडू ४५० रु./किलो, खोबऱ्याचे लाडू ५५० रु./किलो, तर सोनपापडी ४०० रुपये किलो.
आरोग्यदायी पर्याय : सुकामेवा मिक्स खास मिठाईची पाकिटे १००० रुपये किलो, तर ६०० रुपये किलो भावाने बिनसाखरेची (शुगर फ्री) मिठाईही बाजारात उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.