मुंबई

नैना क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी शासकीय जागा उपलब्ध करा

CD

नैना गावांच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर
गावठाण विस्तारासाठी आमदार प्रशांत ठाकूरांची मागणी

पनवेल, ता. ५ (बातमीदार) : नैना क्षेत्रातील गावांच्या विकासकामांना गती देण्यासाठी शासकीय जमिनी ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्याव्यात, तसेच शिवकर गावाचा प्रलंबित गावठाण विस्ताराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या दोन्ही प्रश्नांवर जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले.

नैना क्षेत्रातील गावांमध्ये शाळा, आरोग्य केंद्रे, क्रीडांगणे तसेच अन्य सार्वजनिक सुविधांची उभारणी करण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे गुरचरण, गायरान आणि अन्य शासकीय जमिनी संबंधित ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ठाकूर यांनी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी जागेचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवकर येथील सर्व्हे क्रमांक १२९ मधील ०८-३०-८० हेक्टर क्षेत्रावरील गावठाण विस्ताराचा प्रश्नही त्यांनी महसूलमंत्र्यांसमोर मांडला. १९३९ पासून अस्तित्वात असलेली गावठाणाची रचना, गावकऱ्यांची निवासी घरे, यापूर्वी झालेला गावठाण विस्तार आणि महसूल अभिलेखातील गुरचरण नोंदी यांमधील विसंगतीमुळे हा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

दोन्ही विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूलमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची तयारी दर्शवली. या वेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच आनंद ढवळे आणि संबंधित ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.

पाठपुरावा सुरूच
नैना क्षेत्रातील गावांना सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक जागा मिळावी आणि शिवकर गावातील नागरिकांचा गावठाण विस्ताराचा प्रश्न न्याय्य पद्धतीने मार्गी लागावा, यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

IND vs NZ 2nd ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना केव्हा? किती वाजता सुरू होणार अन् Live कुठे पाहता येणार

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

SCROLL FOR NEXT