मुंबई

स्मार्टफोनच्या युगातही विद्यार्थ्यांचा किल्ला बनवण्याचा उत्साह कायम

CD

किल्ले उभारण्यात मुले दंग
महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी जपली ऐतिहासिक परंपरा
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : स्मार्टफोन, व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडियाच्या वाढत्या आकर्षणामुळे मुलांचे बालपण डिजिटल विश्वात रमू लागले असताना दिवाळीतील पारंपरिक किल्ले उभारण्याची संस्कृती मात्र अद्याप टिकून आहे. याची प्रचीती नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा येथे आली. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय क्रमांक ११७ मधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत ऐतिहासिक किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली असून, या उपक्रमातून दिवाळीतील किल्ले उभारण्याची परंपरा उत्साहाने जपली आहे.

दिवाळी म्हटली की फराळ, आकाशकंदील, पणत्या आणि फटाक्यांसोबतच मातीच्या किल्ल्यांचेही विशेष आकर्षण असते. पूर्वी दिवाळीच्या सुट्टीत मुले मित्रमंडळींसोबत दगड, माती गोळा करून अंगणात किल्ले उभारण्यात रमायची, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे हा पारंपरिक उपक्रम काहीसा मागे पडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या कल्पकतेला सर्जनशीलतेची जोड देऊन ही परंपरा जिवंत ठेवली आहे.

विद्यार्थ्यांनी दगड, लाल माती, मावळे, सैनिक, तोफा आणि विविध सजावटीच्या साहित्याचा कल्पकतेने वापर करून किल्ल्याची प्रतिकृती उभारली. किल्ल्याची तटबंदी, त्यावरील मावळे आणि ऐतिहासिक वातावरणाची अनुभूती देणारी सजावट यामुळे या कलाकृतीला विशेष आकर्षक रूप प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रयत्नांतून साकारलेल्या या किल्ल्याचे शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

किल्ले उभारण्याचा हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. त्यातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना, गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि मराठ्यांच्या शौर्यशाली इतिहासाची ओळख होते. तसेच, एकत्र काम करण्याची वृत्ती, कल्पकता आणि श्रमाचे महत्त्वही शिकायला मिळते. डिजिटल युगातील मुलांनी प्रत्यक्ष कृतीतून इतिहासाशी नाते जोडण्याचा केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

IND vs NZ 2nd ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना केव्हा? किती वाजता सुरू होणार अन् Live कुठे पाहता येणार

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

SCROLL FOR NEXT