महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ
कांजूरमार्ग येथील दिवाळीपूर्व प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या एस विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कांजूरमार्ग पूर्व येथे दिवाळीपूर्व प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ३ आणि ४ नोव्हेंबरला दोन दिवस भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा, संचालक आणि एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कांजूरमार्ग पूर्व येथील लोढा कॉम्प्लेक्सच्या फुटपाथवर, रेल्वे स्थानकाजवळ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले होते.
एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी केली. तसेच महिलांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व नगरसेवकांनीही प्रदर्शनाला भेट देऊन बचत गटांच्या सदस्यांचे मनोबल वाढवले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सजावटीचे साहित्य, आकर्षक वस्तू आणि महिलांनी स्वतः तयार केलेल्या उत्पादनांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
महिला बचत गटांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता यावी, यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एस विभागाच्या समाज विकास अधिकारी सरला राठोड, समुदाय संघटक वर्षा गायकवाड, सविता जुंबडे, सरूप केणी, प्रियांका गणोरकर आणि सूरज पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.