मुंबई

खोट्या प्रतिज्ञापत्रांतून २७ लाखांची फसवणूक

CD

ठाणे, ता. ५ : विमा पॉलिसीधारकांच्या संमतीशिवाय बनावट सह्या आणि खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून विम्याची रक्कम स्वतःच्या भावाच्या बँक खात्यात वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडसइंड निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या ठाण्यातील शाखेतील वरिष्ठ व्यवस्थापक लक्ष्मण शिर्के याने भावाच्या मदतीने पाच विमाधारकांची २७ लाख २४ हजार ५२२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
कंपनीच्या फ्रॉड कंट्रोल युनिटमध्ये उपव्यवस्थापक वासुदेव टिकम यांच्या तक्रारीत, शिर्के याने पाच विमाधारकांच्या पॉलिसीची मिळणारी रक्कम त्यांच्या परवानगीशिवाय बनावट सह्या करून आणि नामनिर्देशित व्यक्तींची खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून मिळवली. एकूण १९ लाख आठ हजार ५२२ रुपये त्याने भावाच्या आयडीएफसी फर्स्ट बँकेतील खात्यात वर्ग केले.
याशिवाय, एका विमाधारकाला पेन्शन पॉलिसी काढून देण्याचे प्रलोभन दाखवून बनावट ई-मेल आयडीच्या माध्यमातून आठ लाख १६ हजार रुपये घेतल्याचाही आरोप आहे. हा प्रकार १९ डिसेंबर २०२५ ते ६ जून २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. लक्ष्मण शिर्के आणि त्याचा भाऊ रामचंद्र शिर्के यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Pune News: शनिवार-रविवार पुण्यातील सिंहगडावर पर्यटकांची मांदियाळी; दोन दिवसांत ४ हजारांहून अधिक जणांची हजेरी

SCROLL FOR NEXT